स्ट्रीट लाईटचे स्मार्ट मीटर तात्काळ काढून त्या ठिकाणी जुने मीटर पूर्ववत बसवावेत…

बांदा ठाकरे सेनेची मागणी:महावितरणचे सहाय्यक अभियंताना निवेदन सादर..

⚡बांदा ता.१३-: बांदा ग्रामसभेत स्मार्ट मीटर बसू नयेत असा ठराव घेण्यात आला असून देखील महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटचे मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले. याचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागणार असून हे स्मार्ट मीटर तात्काळ काढून त्या ठिकाणी जुने मीटर पूर्ववत बसवावेत असे निवेदन शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता साहिल टाके यांना दिले.

यावेळी मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रशांत पांगम, विठ्ठल वाळके आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की शासनाने ठरविलेले स्मार्ट मीटर बांदा गावात बसवू नयेत असा ठराव ग्रामसभेमध्ये घेण्यात आला आहे. असे असूनही महावितरणच्या वतीने ग्रामपंचायतच्या स्ट्रीट लाईटचे जुने मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला कुठलीही माहिती किंवा नोटीस देण्यात आली नाही. त्यामुळे तात्काळ हे मीटर बदलून त्या ठिकाणी जुने मीटर पूर्ववत बसवावेत.
फोटो:-
बांदा येथे महावितरणचे सहाय्यक अभियंता साहिल टाके यांना निवेदन देताना साईप्रसाद काणेकर, प्रशांत पांगम, मिलिंद सावंत व विठ्ठल वाळके.

You cannot copy content of this page