शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल शेजारी उभ्या केलेल्या पाच दुचाकींना मालवाहू टेम्पोन दिली ठोकर…!

⚡सावंतवाडी ता.०९-: शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल शेजारील जिम समोर उभ्या केलेल्या पाच दुचाकींना मालवाहू टेम्पोन ठोकर दिली. यात पाचही दुचाकींच नुकसान झालं. बराच वेळ होऊन देखील पोलिस घटनास्थळी दाखल नवहते‌ त्यामुळे वातावरण तंग झाले होते.

मच्छि मार्केट रोड येथे ही घटना घडली. यात एका मालवाहू टेम्पो न पाच दुचाकींना ठोकर दिली. यात त्या गाड्यांच मोठं नुकसान झालं.‌ टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप नुकसानग्रस्त दुचाकी मालकांनी केला आहे. यामुळे वातावरण देखील तंग झाले होते. बराचवेळ पोलीस दाखल न झाल्यानं वादही चिघळला होता. अखेर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी हा वाद शांत करत पुढील सोपस्कार पार पाडले. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

You cannot copy content of this page