नूतन जिल्हाधिकारी श्रीम.तृप्ती धोडमिसे यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांसकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

⚡कणकवली ता.०९-: राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्रीम.तृप्ती धोडमिसे यांचे पुष्पगुच्छ देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत केले.यावेळी विविध विकास कामांवर आणि विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.ई-पिक पाणी मध्ये फळबागांची पीक पाहणी दरवर्षी करावी लागते.वास्तविक काजू,आंबा या फळबागांच्या बाबतीत दरवर्षी ई पीक पाहणी करण्याची अट शिथिल करण्याची गरज आहे.मध्यंतरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मा.आयुक्तांच्या हि बाब निदर्शनास आणून दिली आहे.त्यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.त्यामुळे आपण याबाबत योग्य ती कारवाई करावी.त्याचप्रमाणे महामार्गावर अनेकदा काही वाहने धोकादायक स्थितीत उभी केली जातात किंवा बंद पडल्यानंतर तेथेच उभी केली जातात.त्यामुळे रात्रीच्या वेळी मोटार सायकल अथवा अन्य वाहन मागून येऊन धडकल्याने काहींचा मृत्यू झालेला आहे.अशा बाबतीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार कंपनीला सूचना देऊन अशी बंद पडलेली वाहने तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात याव्यात.यासाठी आरटीओ व सिंधुदुर्ग पोलीस यांची जॉईन मीटिंग घेऊन अशा सूचना व्हाव्यात अशी मागणी केली जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केली.
प्रसंगी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनवकर,प्रदेश चिटणीस एम.के गावडे,प्रदेश चिटणीस सुरेश गवस,महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब,युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर,जिल्हा प्रतिनिधी केदार खोत,सावंतवाडी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष उदय भोसले,व्ही.जे
एन.टी जिल्हाध्यक्ष अशोक पवार,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असलम खतीब,ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर,जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे,कुडाळ तालुका अध्यक्ष आर.के.सावंत,सावंतवाडी महिला तालुका अध्यक्ष रिद्धी परब,महिला पदाधिकारी उज्वला येळाविकर,राष्ट्रवादी पदाधिकारी अनंतराज पाटकर,वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर,कणकवली शहर अध्यक्ष इमरान शेख,कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर,संतोष राऊळ, गजानन कुंभार,चंद्रशेखर मांजरेकर,जहीर फकीर,राष्ट्रवादी पदाधिकारी राजेश पताडे,जिल्हा सचिव मनोहर साटम,जिल्हा उपाध्यक्ष एम.डी.सावंत,विजय येळाविकर तसेच राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page