जिल्हा रूग्णालयातिल आय सी यु बाबत व्हायरल होणाऱ्या फोटोच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी चौकशी करण्याची गरज..

मनसे नेते परशुराम उपरकर यांची मागणी

*💫कणकवली दि.०६-:* 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी नोंदणी केलेल्याना लस दिली जाते. पण पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. 45 व 60 वर्ष वरील लोकांना लस न देता लसीकरण केंद्रावरून परत पाठविले जात आहे. लसीकरण यंत्रणेचा पूर्णता बट्ट्याबोळ झालेला आहे. यात पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. तसेच जिल्ह्यात व्हेंटिलेटर, ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत योग्य दक्षता घेण्याची गरज आहे. जिल्हा रुग्णालयातील आयसीयूबाबत व्हायरल होणाऱ्या फोटोच्या अनुषंगाने चौकशी करून कारवाईची गरज असल्याचे, मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे. श्री उपरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, शासनाने 18 ते 44 वयोगटातील लोकांना लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशननुसार प्लस दिली जाते. पण 45 वर्षावरील तसेच ज्येष्ठांना लसीकरण केंद्रावरून लस न देता परत पाठविण्यात येत आहे. लसीकरणाचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. कधी येणार याबाबत निश्चित माहिती नाही. लोक लसीकरण सेंटरवर खेपा मारत आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्र्यांनी या लसीकरणाबाबत गांभीर्याने लक्ष घालून जास्तीत जास्त लस पुरवठा कसा होईल व ऑनलाइन शक्य नसल्यास लसीकरणाची काय व्यवस्था करता येईल याबाबत योग्य नियोजन करण्याची गरज आहे. मात्र सत्ताधारी मंडळी यात गांभीर्याने लक्ष घालत नाहीत असा आरोपही श्री उपरकर यांनी केला आहे. आज जिल्ह्याला ऑक्सीजन व्हेंटिलेटरची गरज आहे. जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन प्लांट सुरू केला असला तरी येथेही 30 टक्के ऑक्सीजन सिलेंडर मधील असतो. त्यामुळे या प्लांट सोबतच सावंतवाडी, कणकवली, शिरोडा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन प्लांट बसवायला पाहिजे. तसेच प्रत्येक तालुक्यात किमान एक कोविड रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे. व्हेंटिलेटर देण्याची घोषणा केली जाते मात्र अद्याप व्हेंटिलेटर का बसवले जात नाहीत? उपलब्ध वेंटीलेटर महिला रुग्णालय व अन्य ठिकाणी बसवा. आज लोक वेंटीलेटर, ऑक्सिजन अभावी मरत आहेत अशा परिस्थितीत तातडीने कारवाई होत नसेल तर घोषणाबाजी करून उपयोग काय? जिल्हा रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट म्हणून जे काम करताहेत त्यांचा इतर ठिकाणी वापर केला जातो. अशा परिस्थितीत रिपोर्टमध्ये काही चुका झाल्यास जबाबदार कोण? पालकमंत्र्यांनी दोन दिवसात शववाहिनी देण्याचे आश्वासन दिले, मात्र दोन आठवडे उलटून गेले तरीही त्याबाबत कोणतीच कारवाई झालेली नाही. अशा पोकळ घोषणा देण्यात अर्थ काय? हा सर्व प्रकार म्हणजे जिल्हावाशीयांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे असेही श्री उपरकर यांनी म्हटले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आय सी यू मध्ये एसी नसल्याने रुग्णांचे नातेवाईक घराकडून फॅन आणून वारा देत असल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. मुळात आयसीयूमध्ये एसी असणे आवश्यक आहे. या ठिकाणी जरी कोवीडचे रुग्ण असले तरीही तेथे सर्व रुग्ण हे कोवीडचे असतात व जाणारे डॉक्टर्स नर्सेस पिपीई किट घालून जातात. एसी मुळे पेशंटना काही प्रमाणात आराम वाटतो, अशी सारी परिस्थिती असताना जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये पेशंटचे नातेवाईक घराकडील पंखे आणून रूग्णांना वारा देत आहेत, हा प्रकार गंभीर आहे. आयसीयूमध्ये एसी नसल्याने तपासणीला जाणारे डॉक्टर्स तसेच काम करणारे कर्मचारी ही हैराण होत आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी व्हायला हवी. असे बेजबाबदार प्रकार घडत असतील तर रुग्णांच्या जीवाला धोका आहे. तसेच रुग्णांना मिळणाऱ्या जेवनाच्या दर्ज्याबाबतही दक्षता घेण्याची गरज आहे असेही श्री. उपरकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page