आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेना गणेश सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

१७ वार्ड मधून ९० पेक्षा स्पर्धकांचा सहभाग..

कुडाळ : आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून गेले दोन दिवस या स्पर्धेचे परीक्षण सुरू आहे.
आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेला प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील सतरा वार्ड मधून ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण गेले दोन दिवस सुरू आहे. पहिल्या दिवशी झालेल्या परीक्षणासाठी शहर प्रमुख अभी गावडे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, उपशहरप्रमुख चेतन पडते, युवा शहर प्रमुख आबा धडाम, कविलकाटे शाखा प्रमुख राजन जळवी, राजाराम गडेकर, आनंद अणावकर, लक्ष्मीवाडी शाखाप्रमुख प्रथमेश कांबळी, योगेश काळप, तुपटवाडी शाखाप्रमुख संदेश सावंत, परीक्षक महेश राऊळ, रजनीकांत कदम तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page