⚡बांदा ता.२४-: बांदा शहर व परिसरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून आज बांदा दोडामार्ग रस्त्यावर गडगेवाडी येथे भर वस्तीत असलेला देवेंद्र अनंत धामापूरकर यांच्या मालकीचा बंगला अज्ञात चोरट्याने फोडला. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्राथमिक माहिती घेण्याचे काम सुरु आहे. गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने चोरीच्या घटनात वाढ होऊ लागल्याने स्थानिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीची माहिती ठेकेदार आपा धामापूरकर यांनी दिली आहे. ते सायंकाळी 4.30 वाजता पाहणी करून गेले होते. मात्र रात्री उशिरा त्याठिकाणी गेले असता त्यांना बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडलेला दिसला. त्यांनी याची माहिती बांदा पोलिसाना दिली आहे.
बांदा- दोडामार्ग बंगला अज्ञात चोरट्याने फोडला…!
