विशाल परब: वेंगुर्ल्यात पदाधिकाऱ्यांकडून परब यांचं जल्लोषी स्वागत..
⚡वेंगुर्ले, ता.२३: भाजप हा पक्ष माझ्या हृदयात आहे. त्यामुळे पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काही झाले तरी आयुष्यभर भाजपासोबत प्रामाणिक राहणार, अशी ग्वाही भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज येथे दिली. दरम्यान जिल्ह्याचे सुपुत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष होतो, यातून भाजपची खरी ताकद दिसून येते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात याचा परिपाक नक्कीच दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री परब यांनी आज वेंगुर्ला भाजप करायला भेट दिली यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं.