⚡वैभववाडी ता.२४-: वैभववाडी तालुक्यातील नावळे गावाच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदी पत्रकार संजय मारुती शेळके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
नावळे ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच सोनल गुरव यांच्या अध्यक्षखाली संपन्न झाली या सभेमध्ये गावच्या विकासावर चर्चा करण्यात आली यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीची ही निवड करण्यात आली या निवडी मधून अध्यक्ष म्हणून पत्रकार संजय मारुती शेळके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली सूचक संजय आत्माराम पाटील तर यांना अनुमोदन रमेश तुकाराम गुरव यांनी दिले उपस्थित ग्रामस्थांनी नूतन तंटामुक्त अध्यक्ष संजय शेळके यांचे अभिनंदन केले.