⚡मालवण ता.२३-:
मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने गणेशोत्सव कालावधीत मालवण तालुका पत्रकार समिती सदस्यांसाठी तालुकास्तरीय घरगुती गणेश मूर्ती व सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघांचे कार्यकारणी सदस्य अमित खोत यांच्याकडे स्पर्धा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अशी माहिती मालवण पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी दिली.
स्पर्धेतील विजेत्या पाच स्पर्धकांना आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. तर सर्व सहभागी स्पर्धकांना विशेष सन्मानित केले जाणार आहे.
तालुकास्तरीय स्पर्धा आयोजन बाबत मालवण तालुका पत्रकार समिती बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सदस्यांनी गणेश मूर्ती व सजावटीचे फोटो स्पर्धा प्रमुख अमित खोत मोबा 9404457788 यांच्याशी संपर्क साधून 30 ऑगस्ट पूर्वी पाठवावेत. अमित खोत, अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम, जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, छायाचित्रकार समीर म्हाडगुत ही पाच सदस्यीय परीक्षक टीम प्राप्त फोटो मधून तसेच काही ठिकाणी प्रत्यक्ष स्पर्धकांच्या घरी जाऊन परीक्षण करतील. त्यानंतर अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, जिल्हा उपाध्यक्ष बंटी केनवडेकर व स्पर्धा प्रमुख अमित खोत यांच्या वतीने अंतिम निकाल जाहीर केला जाईल. अशी माहिती पत्रकार समिती सहसचिव नितीन गावडे यांनी दिली आहे.