काँग्रेस वाढीसाठी आपापला विभाग आणि गाव सक्षम करा…

रमेश किर:जिल्हा काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार..

कुडाळ : काँग्रेस पुन्हा नक्कीच उभारी घेईल. पण प्रत्येक पदाधिकाऱ्यांने आपापला विभाग किंवा गाव सक्षम करण्याच्या दृष्टी प्रयत्न करायला पाहिजेत, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीत नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा मराठा समाज हाॅल कुडाळ येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. किर बोलत होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत नव्याने नियुक्त करण्यात आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर, सरचिटणीस हुस्नबानो खलिफे, सरचिटणीस साईनाथ चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुरवातीला जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मार्गदर्शक स्वर्गीय विकासभाई सावंत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना रमेश कीर म्हणाले, 1978 पासून मी पक्षाचे काम करत आहे. आज पर्यंत पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडली. आपण माझा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद. पण मी फक्त सत्कार स्विकारायला अलेलो नाही तर आपल्या सर्वांना भेटण्यासाठी आणि संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी आलो आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७८ वर्षाच्या काळात काँग्रेसने अनेक चढउतार बघीतले आहेत. काँग्रेस पुन्हा नक्कीच उभारी घेईल. परंतू आपण नक्की पक्षासाठी काय योगदान देतो याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक पदाधिकाऱ्यांने आपापला विभाग किंवा गाव सक्षम करण्याच्या दृष्टी प्रयत्न करायला पाहिजेत. हल्लीच कोकण पदवीधर मतदारसंघात रमेश कीर यांनी निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत आलेले अनुभव त्यांनी या प्रसंगी सांगीतले.
माजी आमदार आणि नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस हुस्नबानो खलिफे सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, मी जिल्ह्याची माहेरवाशीण आहे. आपण माझा केलेला हा सत्कार घरातला सत्कार आहे. पक्ष संघटनेत मागे काय झाले याचा विचार न करता आपण वर्तमानात व भविष्यात काय करता येईल याचा विचार करूया. पक्षाच्या चिन्हावर आपण निवडणूक लढवली पाहिजे, तरच पक्षाच्या कार्यकर्तांमध्ये चैतन्य निर्माण होते. या सत्कार प्रसांगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त सरचिटणीस साईनाथ चव्हाण यांनी सांगीतले की, आपण १९८५ पासून गेली चाळीस वर्षे काँग्रेसचे पक्षाचे काम निष्ठेने करत आलो आहे. १९९९मध्ये काँग्रेस पक्ष फुटला त्यावेळी आपण मालवण तालुका काँग्रेसचा अध्यक्ष होतो. सगळ्या तालुक्यांचे अध्यक्ष राष्ट्रवादीत गेले पण मी कुठेही गेलो नाही. मी निष्ठेने काँग्रेस पक्षासोबतच रहिलो. ४० वर्षे काँग्रेस पक्षाचे काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केल्यामुळे पक्षाने माझा सन्मान करून मला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पद दिले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सरचिटणीस म्हणून पक्ष जी जबाबदारी देईल ती मी प्रामाणिकपणे पार पाडीन.
या कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, प्रकाश जैतापकर, उपाध्यक्ष विलास गावडे, नागेश मोर्ये, विजय प्रभू, मेघनाद धुरी, सरचिटणीस रविंद्र म्हापसेकर, प्रविण वरुणकर, विनायक मेस्त्री, चंद्रशेखर जोशी, केतनकुमार गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, विभावरी सुकी, राघवेंद्र नार्वेकर, सुंदर सावंत, आय.वाय.शेख, अमोल सावंत, बाळा धाऊसकर, बाळासाहेब नंद्दीहळ्ळी, विद्याप्रसाद बांदेकर, तबरेज शेख, महेश परब, तौसीफ शेख, अजिंक्य गावडे, विजय खाडे, संदेश कोयंडे, हेमंत माळकर, समीर वंजारी, सुधीर मल्हार, सुंदरवल्ली स्वामी, महेंद्र मांजरेकर, संदिप सुकी, आनंद परूळेकर, संतोष मुंज, दादा नेवरेकर, व्ही.के. सावंत, उल्हास शिरसाट, लक्ष्मीकांत परुळेकर, बाबा फर्नांडिस, बाळा शिरोडकर, विरेश देऊलकर, बाबा चव्हाण इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page