वीनापरवाना बंदूका बाळगल्याप्रकरणी संशयिताला सशर्त जामीन मंजूर…

कुडाळ : वीना परवाना बंदूका बाळगल्या प्रकरणी संशयित आरोपित अभिषेक अंकुश घाडी (रा. हेदूळ तालुका मालवण) याला सिंधुर्ग ओरोस येथील मे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने रु. ५० हजार रकमेचा जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. सिद्धेश तवटे आणि ॲड. दिव्या म्हाडदळकर यांनी काम पाहिले त्यांना ॲड. संदेश तायशेटे यांनी मार्गदर्शन केले.
याबाबत ऍड. संदेश तायशेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अभिषेक अंकुश घाडी (रा. मु पो हेदुळ, मधलीवाडी, ता. मालवण) याचेकडुन २ बेकायदेशीर अग्नीशस्त्र जप्त करून त्यास दाखल गुन्हयात दि.१०/०८/२०२५ रोजी अटक करण्यात आले होते. आरोपीत यांने शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,5,7,25,25(1)(a),25(1A),25(1AA),25(1B),27,29 तसेच वन्य जीव संरक्षण कायदा कलम 9,31,51, महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम 65(e), भारतीय न्याय्य संहिता 3(5),49 प्रमाणे गुन्हा केला. या आरोपावरुन कुडाळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी याला दिनांक १०/०८/२०२५ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला दि. ११/०८/२०२५ रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय कुडाळ येथे हजर केले असता त्याला दिनांक २५/०८/२०२५ पर्यत न्यायालयीन कोठडीचा आदेश करण्यात आला होता. संशयित आरोपी अभिषेक अंकुश घाडी याचे जामिनावर मुक्तता होण्यासाठी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील मे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. मे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी आरोपी याला ५० हजार रकमेचा सशर्त जामीनावर मुक्तता केली. संशयित आरोपी याचे वतीने ॲड सिद्धेश तवटे आणि ॲड दिव्या म्हाडदळकर यांनी काम पाहिले त्यांना ॲड. संदेश तायशेटे यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page