आमदार निलेश राणे यांच्या चेंदवन बंधाऱ्याच काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना…

कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची पाहणी..

⚡ओरोस ता.२२-: चेंदवन खालची मळेवाडी व चेंदवन खारीचा बांध येथे ५ कोटी रुपयांचा निधी खर्चून खार बंधारा उभारला जात आहे. या बांधाऱ्यासाठी गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू असून हा मंजूर बंधारा लवकरात सुरु व्हावा यासाठी आमदार निलेश राणे यांच्याजवळ चेंदवन ग्रामस्थांनी मागणी केली होती, त्या नुसार आमदार निलेश राणे पतन विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज या बंधाऱ्याच्या जागेची कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाणी केली. लवकरची याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे.

यावेळी कांदळवन विभागाचे अधिकारी, शिवसेना तालूकाप्रमुख विनायक राणे, चेंदवन माजी सरपंच देवेंद्र नाईक, संदेश सुकळवाडकर यांच्यासह चेंदवन ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page