संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचा पुढाकार..
⚡सावंतवाडी,ता.२२-: न्हावेली गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बसण्याच्या बाकड्यांची सोय करण्यात आली आहे. न्हावेलीचे उपसरपंच आणि शिवसेना उपतालुका प्रमुख अक्षय पार्सेकर यांच्या प्रयत्नातून हे काम पूर्ण झाले. निर्गुणवाडी बस थांबा आणि न्हावेली ईश्वटी मंदिरा जवळ हे बाकडे बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थ या ठिकाणी बसण्याची सोय नसल्यामुळे गैरसोयीचा सामना करत होते. अखेरीस, उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी ही बाब जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या निदर्शनास आणली. त्यांच्या मागणीनुसार, तातडीने बाकडे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचे आभार मानले आहेत.
यावेळी न्हावेली उपसरपंच तथा शिवसेना उपतालुका प्रमुख अक्षय पार्सेकर, प्रशांत साटेलकर, नवनाथ पार्सेकर, प्रथमेश नाईक, समीर पार्सेकर, परेश दळवी, अजय पार्सेकर, राज धवण, अमोल पार्सेकर, प्रथमेश आरोंदेकर, चेतन पार्सेकर, अतुल चौकेकर, यश पार्सेकर, सिद्धेश धवण, दीपक पार्सेकर, जीत आरोंदेकर, तुषार माळकर,, सौरभ पार्सेकर आणि अजय नाईक यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.