⚡मालवण ता.२२-:
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हर घर तिरंगा अभियानांतर्गत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा क्राफ्ट व तिरंगा रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला या उपक्रमात प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
तिरंग्याच्या तीन रंगांवर आधारित विविध पोस्टर्स, पेंटिंग, शोभिवंत वस्तू तयार करत विद्यार्थ्यांनी शाळेची दर्शनी भिंत सजवली. या प्रदर्शनाचे उद्घाटन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांनी केले
तसेच विविधतेतून एकता, राष्ट्रीय एकात्मता, भारतीय संस्कृती, भारतीय सेना, वृक्ष संवर्धन असे विविध विषय दर्शवणाऱ्या रांगोळी यावेळी विद्यार्थ्यांनी साकारल्या. या रांगोळी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई यांनी केले. या दोन्ही उपक्रमांसाठी कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी समाजशास्त्र विषय समितीमार्फत जागतिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती देणाऱ्या ‘मोहर’ भितीपत्रकाचे अनावरण पंचायत समितीच्या विषय तज्ञ सौ आरती कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या भीतीपत्रकासाठी समाजशास्त्र विषय प्रमुख एकनाथ राऊळ यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले देशभक्तीपर समूहगीत, संगीत कवायत, तिरंगा रॅली अशा विविध माध्यमातून हा स्वातंत्र्यसोहळा संपन्न झाला.
या स्तुत्य उपक्रमासाठी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर तसेच संस्था पदाधिकारी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे , पर्यवेक्षक श्री महेश भाट तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.