⚡सावंतवाडी,ता.२१-: तळवडे गावाच्या शांतता आणि सलोख्यासाठी स्थापन झालेल्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सचिन परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गावच्या विकासासाठी आणि विविध वादांवर सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी त्यांचा अनुभव निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
या निवडीच्या वेळी बोलताना श्री. सचिन परब यांनी, “ग्रामस्थांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. या पदाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यासाठी आणि कोणताही वाद सामंजस्याने मिटवण्यासाठी मी प्रयत्न करेन,” असे सांगितले.
श्री. परब यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी रोहित परब, अमृत परब, कृष्णा परब, रोहन परब, विकास गावडे, सचिन मसुरकर, आनंद पवार, अनिकेत काजरेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.या निवडीमुळे तळवडे गावामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, गावातील तंटामुक्त अभियानाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तळवडे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सचिन परब यांची बिनविरोध निवड…!
