विनायक मानवर याचा दांडी रहिवाशांतर्फे सत्कार…

⚡मालवण ता.२१-:
मालवण येथील दांडी शाळेचा माजी विद्यार्थी आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनसीसी विद्यार्थी विनायक मानवर याची भारतीय नौदलात निवड झाल्याने दांडी रहिवाशांतर्फे दांडी येथे विनायक मानवर याचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी आनंद हुले यांच्या हस्ते विनायक मानवर याला शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रश्मीन रोगे, सुभाष मांजरेकर, अन्वय प्रभू, बाळा मिठकर, भूषण आचरेकर, आना मोंडकर, हेमंत मोंडकर, रवि कोयंडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page