वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन…

⚡मालवण ता.९-:
गेले चार दिवस मालवणसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा हा जोर आणखी वाढणार असू कोकण किनारपट्टीवर शुक्रवार दि.२२ ऑगस्ट पर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीत समुद्रातील वाऱ्याचा वेग ४५ ते ५० कि.मी. प्रती ताशी राहणार असून तो ६५ कि.मी. प्रती ताशी पर्यंत जाण्याचा अंदाज असून या कालावधीत समुद्र वादळी वाऱ्यासह खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात जावू नये तसेच किनाऱ्यालगतच्या नागरिकांनीही खबरदारी घ्यावी अशी सूचना हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी याबाबत मच्छीमारांना आणि किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र राज्यातील कोकण किनारपट्टीवर दि. १८ते २२ या दरम्यान वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या कालावधी दरम्यान समुद्रातील वाऱ्याचा वेग ४५ ते ५० कि.मी. प्रती ताशी रहणार असून तो ६५ कि.मी. प्रती ताशी पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. समुद्र वादळी वाऱ्यासह खवळलेल्या स्थितीत राहणार असून या कालावधीत मच्छिमारांनी सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रात जावू नये असे अवाहन करण्यात येत आहे. वरील कालावधीमध्ये वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने आपल्या जिल्ह्यातील मच्छिमार, मच्छिमार सहकारी संस्थां, नौका मालक यांना हवामान विषयक अंदाज आणि सतर्तकेचा इशारा बाबत देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page