वराडकर हायस्कूल कट्टाच्या स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनच्या माध्यमातून जपली सामाजिक बांधिलकी…

⚡मालवण ता.१२-:
रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे स्काऊट गाईड व हरित सेना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांतर्गत वृक्ष रक्षाबंधन व परिसरातील रिक्षा बांधव, व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना राखी बांधत सामाजिक बांधिलकी जपली.

पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सर्वांना समजावे यासाठी ‘ झाडे लावा झाडे जगवा!’ असा संदेश देणारी आकर्षक राखी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी कट्टा बाजारपेठ येथील पिंपळ वृक्षाला बांधली.

या कार्यक्रमासाठी स्काऊट गाईड विभाग प्रमुख श्री समीर चांदरकर, हरित सेना विभाग प्रमुख श्री बाळकृष्ण वाजंत्री,स्काऊट शिक्षक श्री एकनाथ राऊळ श्री किसन हडलगेकर, श्री भूषण गावडे, गाईड शिक्षिका सौ सिमरन चांदरकर, सौ. दळवी उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमासाठी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे , पर्यवेक्षक श्री महेश भाट तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

झाडांच्या बियांपासून विद्यार्थ्यांनी बनवल्या राख्या.

रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनी झाडांच्या बियांपासून आकर्षक पर्यावरण पूरक राख्या बनवल्या.प्रशाळेच्या कला विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमात आपल्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करत आकर्षक राख्या बनवल्या तसेच वृक्ष संवर्धनाचा संदेशही दिला .

You cannot copy content of this page