⚡मालवण ता.१२-:
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रिडा परिषद, सिंधुदुर्ग आणि कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धांचे आयोजन सिद्धिविनायक हॉल कट्टा येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टा ची बारावीची विद्यार्थिनी कु. दुर्वा दिलीप राणे हिने १९ वर्षाखालील गटातून तर, कु. गौरी हेमंत माळकर हिने १७ वर्षाखालील गटातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर १९ वर्षाखालील मुलांच्या गटातून कु. प्रणव निलेश मर्गज याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
तसेच कु. रविना रामचंद्र गायरी, कु. अनुष्का मंगेश थवी, कु. ईश्वरी विष्णू रावले, कु. गंगुताई गंगाराम पाटील ( सर्व बारावी) यांनी या स्पर्धेत अनुक्रमे तृतीय, चौथा, पाचवा व सहावा क्रमांक पटकाविला आहे. या विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक संदिप गोळवणकर यांनी मार्गदर्शन केले
स्पर्धेत यशस्वी व सहभागी विद्यार्थांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनिल नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई, सर्व संस्था संचालक, मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
