Headlines

अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात ८ ऑगस्टला ठाकरे सेनेचा ‘बँडबाजा बारात’ आंदोलन…

मायकल डिसोजा:कारागृहाचे बांधकाम कोसळले असले तरी त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही..

⚡सावंतवाडी ता.०१-: जिल्ह्यातील शासकीय कामांमध्ये अधिकारी मनमानी करत असल्याचा आणि तक्रारी करूनही कामांना गती मिळत नसल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख मायकल डिसोझा यांनी येत्या ८ ऑगस्ट रोजी अनोख्या आंदोलनाची हाक दिली आहे. कुंभकर्णाला जागे करण्यासाठी ढोल वाजवले जातात, त्याचप्रमाणे झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी ‘बँडबाजा बारात’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे डिसोझा यांनी म्हटले आहे.

मायकल डिसोझा यांच्या मते, सध्या शासनाची कामे अत्यंत ढिसाळपणे सुरू आहेत आणि अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. ऐतिहासिक कारागृहाचे बांधकाम कोसळले असले तरी त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. बांधकाम विभाग आणि नगरपालिकेसह अनेक विभागांमध्ये अनेक तक्रारी आणि आंदोलने करूनही कामांमध्ये सुधारणा होत नसल्याचे ते म्हणाले.

याच निषेधार्थ ८ ऑगस्ट रोजी बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून या ‘बँडबाजा बारात’ आंदोलनाला सुरुवात होईल. मायकल डिसोझा यांच्यासोबत अशोक धुरी, शैलेश गवांडकर, शकबीर मणियार, आणि विलास टोसरकार हे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

You cannot copy content of this page