⚡वेंगुर्ला ता.०१-: राज्यपरीवहन महामंडळामार्फत हिदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धे अंतर्गत कोल्हापूर विभागाच्या पथकाने वेंगुर्ला आगार व वेंगुर्ला बस स्थानकाची पहाणी केली.
स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेत सहभागी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८ बस स्थानकांची तपासणी या कोल्हापूर विभागाच्या समिती मार्फत सुरु आहे. वेंगुर्ला येथे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या कोल्हापूर विभागाच्या सर्वेक्षण समितीचे प्रमुख कोल्हापूर विभागीय नियंत्रक यशवंत कानतोडे, विभागीय कामगार अधिकारी संदीप भोसले यांचे वेंगुर्ला आगार व्यवस्थापक राहूल कुंभार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत स्वच्छता सर्वेक्षण कमिटीचे सदस्य ग्राहक पंचायत प्रवासी संघटना वेंगुर्लाचे तालुका अध्यक्ष राधाकृष्ण वेतुरकर, या समितीचे पत्रकार सदस्य प्रतिनीधी भरत सातोस्कर तसेच बस स्थानक प्रमुख तेजस तारी, वेंगुर्ल्याचे वाहतूक निरीक्षक चंद्रशेखर सावंत, प्रमोद परूळेकर, शिरोडा बसस्थानक वहातुक नियंत्रक लालसिंग पवार आदी उपस्थित होते.
या स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेत वर्षभरात वेंगुर्ला आगाराच्या अधिपत्याखाली येणा-या वेंगुर्ला बस स्थानक व शिरोडा बस स्थानक या बस स्थानकातील परिसर, बसेस, वेंगुर्ला आगार परिसर, बस स्थानक स्वच्छतेबरोबरच पर्यावरण पूरक वसुंधरेबाबत केलेले काम, प्रवाशांसाठी केलेल्या सेवा सुविधा, प्रवाशांसाठी केलेल्या विविध योजना, प्रवाशांसाठी बसचे वेळापत्रक तसेच अन्य बाबी यांची पाहणी या समितीने प्रत्यक्ष विविध जागेवर जात काटेकोरपणे केली.
फोटोओळी – कोल्हापूर विभागाच्या सर्वेक्षण समितीचे प्रमुख कोल्हापूर विभागीय नियंत्रक यशवंत कानतोडे यांचे वेंगुर्ला आगार व्यवस्थापक राहूल कुंभार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
वेंगुर्ला आगार व बसस्थानकाची पथकाद्वारे पाहणी…
