संजू परब: चॅलेंज देणाऱ्यांनी पहिलं आपलं गाव सांभाळावं; आमच्या नादी लागू नये, बॉस इज ऑलवेज बॉस, महेश सांरग यांना थेट इशारा..
⚡सावंतवाडी, ता. ०१:- कोलगाव ग्रामपंचायतीचे भाजपचे चारही विद्यमान सदस्य आपल्यासोबत असून ते कधीही शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार आहेत. मात्र, महायुतीच्या नेत्यांचा मान राखून सध्या कोणताही प्रवेश घेतला जात नसल्याचे संजू परब यांनी थेट सारंग यांना इशारा दिला आहे
“आम्हाला कोणी आव्हान देऊ नये. त्यांनी पहिले आपले गाव सांभाळावे,” अशा शब्दांत परब यांनी सारंग यांना सुनावले. ज्यांच्या डोक्यात हवा होती, ती आम्ही ४८ तासांत काढून टाकल्याचा टोलाही त्यांनी लगावला. “बॉस इज बॉस,” असे म्हणत संजु परब यांनी महेश सारंग यांच्यावर निशाणा साधला.
परब पुढे म्हणाले, “आम्ही जर ठरवले, तर अनेक जण आज प्रवेश करायला तयार आहेत. पण महायुतीच्या नेत्यांचा मान राखून आम्ही हा प्रवेश घेत नाही आहोत. त्यामुळे आमच्या नादाला लागण्याचा कोणी प्रयत्न करू नये. आम्ही जर ठरवले, तर कधीही काही करू शकतो, त्यामुळे आम्हाला कोणी आव्हान देऊ नये.” आता यापुढे कोणत्याही नेत्याचा फोन आला तरी आपण गप्प बसणार नाही, असेही परब यांनी ठामपणे सांगितले. कोलगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान चार सदस्य आपल्यासोबत असून केवळ महायुतीचा मान राखण्यासाठीच आम्ही त्यांचा प्रवेश थांबवला असल्याचे परब यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.