संजू परब यांचा इशारा: केसेस झाले तरी चालेल पण अधिकाऱ्यांना धडा शिकवू..
⚡सावंतवाडी,ता.०१-: सावंतवाडी तालुक्यातील परपोली हे एक महत्त्वाचे पर्यटन गाव असून, येथे अनेक परदेशी पर्यटक भेट देत असतात. मात्र, गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून ते पूर्णपणे खड्डेमय झाले आहेत. निधी उपलब्ध असतानाही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, येत्या आठ दिवसांत रस्त्यांवरील खड्डे बुजवले नाहीत, तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, असा थेट इशारा संजू परब यांनी आज दिला.
ग्रामपंचायत सदस्यांनी अनेक वेळा पाठपुरावा करूनही अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे संजू परब यांनी म्हटले आहे. ऋतुजा परब (ग्रामपंचायत सदस्या) आणि संदेश गुरव (परपोली उपसरपंच) यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. “आम्ही काळे फासण्यास तयार आहोत, आमच्यावर केसेस झाल्या तरी चालतील,” असे परब यांनी ठणकावून सांगितले, ज्यामुळे या प्रश्नाची तीव्रता आणि ग्रामस्थांचा संताप स्पष्ट दिसून येतो. परपोली गावातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.