विठ्ठल पंडीत व जयवंत पंडित:विकासकामे करण्यासाठी सरपंच, सदस्य व ग्रामपंचायत प्रशासन सक्षम..
⚡बांदा ता.३१-: कास गावात गेल्या दोन वर्षांत बहुतांशी विक्रमी विकासकामे मार्गी लागली आहेत. भाजप नेते खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून भरपूर विकास कामे झाली आहेत. असे असतानाही कास गावातील विकास प्रक्रिया थांबल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्याकडे विकासकामांसाठी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ गेल्याचे समजले. मात्र, सत्य परिस्थिती वेगळीच आहे. गावातील जलजीवन प्राधिकरणची कामे व रेखवाडी – कास रस्ता कामाला विरोध करणारेच विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी जाणे हास्यास्पद असल्याची टीका विठ्ठल पंडीत व जयवंत पंडित यांनी
प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.
कास गावातील विकासकामे ठप्प झाल्याचा कांगावा काही अल्पसंतुष्ट ग्रामस्थ करीत आहेत. सत्य स्थिती मात्र वेगळी आहे. हेच ग्रामस्थ जलजीवनची कामे अडवित आहेत. रेखवाडीतून कास गावात येणारा रस्ता सुद्धा यातील ग्रामस्थांनी अडवला आहे. विकासकामे करण्यासाठी सरपंच, सदस्य व ग्रामपंचायत प्रशासन सक्षम आहे. गेल्या दोन वर्षात विक्रमी विकासकाने झाली आहेत. त्यामुळे विकासकामांमध्ये कोणीही ढवळाढवळ करू नये, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला आहे.