⚡मालवण ता.३१-:
भाजपची मालवण तालुका व मालवण शहर कार्यकारिणी आज तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व शहाराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी जाहीर केली. भाजपमध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर असल्याने सर्वांनाच कार्यकारिणीमध्ये न्याय देता येणार नाही, परंतु सर्वच कार्यकर्ते आपापल्या विभागात काम करत आहेत, येत्या निवडणुका लक्षात घेऊन आणि शतप्रतिशत भाजप करण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मान्यतेने ही कार्यकारिणी नेमण्यात आली आहे, असे यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.
मालवण शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, बाबा परब, सुदेश आचरेकर, राजू परुळेकर, महेश मांजरेकर, अन्वेषा आचरेकर, पूजा करलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते संघटनेच्या शिस्तीने आणि जि जबाबदारी दिली असेल त्यानुसार काम करतात. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून कामं करताना जे विकासाचे पर्व सुरु ले ते पर्व विद्यमान पालकमंत्री नितेश राणे पुढे घेऊन जात आहेत. तालुक्यातील सर्व सागरी किनाऱ्यावरील संरक्षक बंधारे पूर्ण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, प्रत्येक कार्यकर्ता सक्षम होण्यासाठी आम्ही काम करू, या सर्वासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे, असेही बाबा मोंडकर म्हणाले.
भाजपा मालवण तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :- तालुकाध्यक्ष – धोंडू चिंदरकर, उपाध्यक्ष – श्रीम. हिमाली सिताराम आमरे, सौ. अनिता अरुण परब, जगदीश चव्हाण, रघुनाथ धुरी, राजन आंबेरकर, सौ. निलिमा नितीन परुळेकर, सरचिटणीस – महेश मांजरेकर, विजय निकम, चिटणीस – दीपक सुर्वे, अशून (बंडू) गावडे, सौ. मिताली प्रशांत कोरगावकर, सौ. विशाखा सकपाळ, मिलिंद मारुती चव्हाण, कोषाध्यक्ष – संतोष गावडे.
शक्ती केंद्र प्रमुख:- आडवली – कमलेश घाडीगावकर, श्रावण – प्रविण घाडीगावकर, राठीवडे – राजेश तांबे
शिरवंडे- आशुतोष सावंत, आचरा –
श्री. समीर बावकर, वायंगणी – शंकर (बाळू) वस्त, चिंदर – सिताराम (देवेंद्र) हडकर, त्रिंबक – महेश वरक, कोळंब – मंगेश चव्हाण, हडी – सुशांत सुर्वे, मसुरे – यासीन सय्यद, वेरली – अशून (बंडू) गावडे, पेंडुर – संदीप बाळकृष्ण सरमळकर, साळेल- शेखर फोंडेकर, वराड- बबन मिठबावकर, कट्टा – महेश वाईरकर, सुकळवाड – सुशिल गावडे, वायंगवडे – विनायक परब, पोईप – विरेश पवार, माळगाव – निलेश खोत.
भाजपा मालवण शहर कार्यकारिणी :- शहराध्यक्ष – विष्णु (बाबा) मोंडकर, उपाध्यक्ष – सचिन आंबेरकर, केदार झाड, सन्मेश परब, मनोज मेथर, महिला उपाध्यक्ष – समीक्षा खोबरेकर, वैष्णवी विष्णु मोंडकर, सरचिटणीस – पंकज सादये, जीवन भोगावकर, चिटणीस – पूनम वाटेगावकर, सुरेश बापार्डेकर, चिटणीस (एससी/एसटी) – रोहन पेंडुरकर, देवेंद्र चव्हाण, महिला चिटणीस – दीक्षा लुडबे, महिमा मयेकर, कोषाध्यक्ष – रविंद्रनाथ खानविलकर, एससी/एसटी सदस्य – संतोष भुटे, दिपक शिंदे, सदस्य – अन्वेषा आचरेकर, सौरभ ताम्हणकर, ललित चव्हाण, रामचंद्र चोपडेकर, रामचंद्र चव्हाण, शंकर सावजी, सहदेव साळगावकर, दशरथ पोखरणकर, जॉन नरोन्हा, मनमोहन वराडकर, स्नेहल पराडकर, संदीप शिरोडकर, पंकज पेडणेकर, राजेंद्र आंबेरकर, दीक्षा गावकर, शंकर वाघ, ममता वराडकर, तारका चव्हाण, संजय चव्हाण, किशोर खानोलकर, प्रमोद करलकर, ज्योति धूरत, वसंत गावकर, रमेश हडकर, श्रीकृष्ण तारी, चंद्रशेखर कुशे, देवानंद लोकेगावकर.
मालवण शहर शक्ती केंद्र प्रमुख – . भालचंद्र राऊत, पंकज शशिकांत पेडणेकर, चंद्रशेखर रजनीकांत कुशे, रमेश (आबा) हडकर, विरेश मांजरेकर, रामचंद्र चोपडेकर, अशोक चव्हाण, देवानंद लोकेगावकर.