वालावल येथील अवैध वाळू उपशावर महसुलची कारवाई…

धडक कारवाईत सहा रॅम्प उध्वस्त:अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले..

⚡कुडाळ ता.३१-: तालुक्यातील वालावल येथील कर्ली नदीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत (बेकायदेशीर) वाळू उपशावर शुक्रवारी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या उपस्थितीत धडक कारवाई करत सहा रॅम्प उध्वस्त करण्यात आले. कुडाळ महसुली विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कुडाळ तालुक्यातील वालावल येथील वाळू पट्ट्यात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती महसुल यंत्रणेला मिळाली होती. यांची दखल घेत कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी स्वतः वालावल येथील वाळू पट्ट्यात आपल्या यंत्रणेसह शुक्रवारी सकाळी ९ वा. च्या सुमारास धडक देत कारवाई केली. यावेळी निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, तलाठी श्रीमती मयेकर, पोलिस पाटील यांच्या पथकाने वालावल येथील कर्ली नदी किनाऱ्यावरील सहा अनधिकृत वाळूचे रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केले.
सध्या शासनाने वाळू उपशाला बंदी घातली असतानाही, जुलै महिन्यात कर्ली नदीमध्ये बोटींद्वारे वाळू काढली जात होती. याच अवैध वाळू वाहतुकीसाठी रॅम्प मालकांनी नदीकिनारी सहा अनधिकृत रॅम्प तयार केले होते.ते सर्व रॅम्प उध्वस्त करण्यात आले.या कारवाई मुळे या भागातील अवैध वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

You cannot copy content of this page