*💫मालवण दि.०३-:* वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी आचरा व्यापारी संघटनेच्या पुढाकाराने आचरे गावात चार दिवसासाठी पुकारण्यात आलेल्या जनता कर्प्युला व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आज पासून या बंदला सुरू झाली असून हा बंद चार दिवसांचा रहाणार आहे आचरा व्यापारी संघटनेच्या पुढाकाराने आचरे गावात आज सोमवार पासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी व्यापारी बांधवांनी आपली आस्थापने बंद ठैवल्याने आणि या बंद मध्ये आचरा रिक्षा संघटनेने सहभागी होत आपले रिक्षा व्यवसाय बंद ठेवल्याने आचरा बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. आचरा गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.यातच खरेदी साठी होणारी गर्दी मुळे संक्रमण वाढण्याची भीती लक्षात घेऊन आचरा व्यापारी संघटनेतर्फे शुक्रवारी बैठक घेऊन सोमवार ते गुरुवार चार दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.हाबंद यशस्वी करण्यासाठी आचरा पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत आचरा यांनी संपूर्ण सहकार्य देण्याचे सांगितले होते. या दृष्टीने सोमवार पासून या बंदला सुरूवात झाली असून आचरा गावातील सर्व व्यापारी बांधवांनी आपली आस्थापने बंद ठेवून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सहकार्य केले आहे.गावच्या सुरक्षेच्या दृष्टीने व्यापारी बांधव आणि रिक्षा व्यावसायिकांनी घेतलेल्या या निर्णया बद्धल जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस, सरपंच प्रणया टेमकर, उपसरपंच पांडूरंग वायंगणकर, व्यापारी संघटनेचे अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परूळेकर, निखिल ढेकणे यांनी सर्व व्यावसायिकांना धन्यवाद व्यक्त केले आहेत
आचरे गावात जनता कर्प्युला व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
