⚡मालवण ता.२७-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर.आर. सी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग ते डॉन बॉस्को हायस्कूल सर्कल पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या रेड रन स्पर्धेत कट्टा येथील डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा च्या कुं. प्रशांत लवू खडपे (एफ. वाय. बी. कॉम) या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) विभागाअंतर्गत रेड रिबन क्लब स्थापन करण्यात आला आहे. या क्लब अंतर्गत एच.आय.व्ही. एड्स नियंत्रण व जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी वडाळा मुंबई यांचे मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर.आर. सी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची रेड रन स्पर्धा जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग ते डॉन बॉस्को हायस्कूल सर्कल या मार्गावर आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा, संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा च्या कुं. प्रशांत लवू खडपे (एफ. वाय. बी. कॉम) या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच कु. तन्मय दीपक यादव व कु. पांडुरंग तुकाराम परब (दोन्हीही एफ. वाय. बी. कॉम) यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील यशस्वी व सहभागी विद्यार्थांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद शरद वराडकर, विश्वस्त ऍड. एस.एस. पवार, अध्यक्ष अजयराज शरद वराडकर यांच्यासह सर्व संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, सर्व प्राध्यापक, कर्मचारी यानी अभिनंदन केले आहे.