⚡मालवण ता.२४-:
शिवसेना सरपंच संघटना मालवण तालुकाप्रमुखपदी देवली सरपंच श्यामसुंदर वाक्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नियुक्तीपत्र दिले. दरम्यान आमदार निलेश राणे यांनी श्यामसुंदर वाक्कर यांचे अभिनंदन करतं पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या मालवण तालुका सरपंच संघटना प्रमुख पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.
सदर नियुक्तीचा कालावधी एका वर्षाचा असेल. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवासेना जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, मंदार लुडबे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.