जलपर्यटन व्यवसायिकांनी घेतली आमदार निलेश राणे यांची भेट…

⚡मालवण ता.२५-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलपर्यटन व्यवसायिकांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन व्यवसायातील विविध अडचणीं समस्या बाबत निवेदन सादर केले. त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि अडीअडचणी दूर करण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी दिले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख राजा गावडे, मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर, वायरी विभागाप्रमुख मंदार लुडबे आदी पदाधिकारी यांसह पर्यटन व्यावसायिक रुपेश प्रभू, सहदेव बापर्डेकर, बाबली चोपडेकर, कांचन खराडे, तोडणकर, समीर सारंग, मीनल परब, राजन परुळेकर, मनोज खोबरेकर, किरण हुरणेकर, योगेश मसुरकर यांसह अन्य जलपर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page