सेवांगण’च्या शिष्यवृती मार्गदर्शन वर्गातील १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत…

⚡मालवण ता.२५-:
बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे मालवण व कट्टा येथे चालविल्या जाणाऱ्या मोफत शिष्यवृती व NMMS मार्गदर्शन वर्गातील १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

मालवण केंद्र आठवी एनएमएमएस वर्गामध्ये एकता धर्मानंद तांडेल, विघ्नेश सुनील मेस्त्री, पायल हरिश्चंद्र पेंडुरकर, प्रथमेश प्रमोद चव्हाण, आठवी २श्ए कट्टा केंद्रामध्ये पलक महाभोज, ओंकार रोहिलकर, कार्तिक पाताडे, मयुर चव्हाण, वैष्णवी गोळवणकर, पाचवी शिष्यवृत्तीमध्ये मधुर पेंडुरकर, गिरीजा नाईक, आठवी शिष्यवृत्तीमध्ये पलक महाभोज या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मालवण येथे गेली तीन वर्षे हा वर्ग सुरू असून कट्टा शाखेत २५ वर्षे हे वर्ग सुरू आहेत. आतापर्यंत दोन्ही शाखांत मिळून १९० पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. या सर्वांचे सेवांगणतर्फे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, शिष्यवृती विभागप्रमुख ज्योती तोरसकर, दीपक भोगटे व मार्गदर्शक मनाली वेंगुर्लेकर, मनोज काळसेकर यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page