मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य..
कणकवली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली माजी सभापती मनोज रावराणे यांच्यावतीने कोळोशी हडपीड येथील विद्यार्थ्यांना कणकवली तालुका भाजप सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्या वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प. शाळा कोळोशी वरची वाडी, जि. प. शाळा कोळोशी हडपिड व माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपिडच्या विद्यार्थ्यांना कणकवली माजी सभापती मनोज रावराणे यांच्यावतीने वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी कणकवली तालुका भाजप सरचिटणीस पंढरी वायंगणकर, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, शाळा समिती अध्यक्ष किशोर राणे, मुख्याध्यापिका अश्विनी गर्जे, मुख्याध्यापिका तेली, मुख्याध्यापिका तांबे, माजी सरपंच सुशील इंदप, सुचिता पोकळे, पत्रकार उत्तम सावंत, मंगेश इंदप, सदानंद पावसकर, शामराव परब, श्रीम. मुंडे आदी मान्यवर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरी वायंगणकर म्हणाले की, आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना ज्या काही समस्या असतील त्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून नक्की सोडविण्याचा प्रयत्न राहील.
अनियमित आयनल एसटी बसमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
यावेळी कोळोशी -हडपिड हायस्कूल मध्ये सध्या ५३ विद्यार्थी असून संध्याकाळी आयनलला जाणारी एस टी अनेक वेळा संध्याकाळी ७:०० वाजले तरी येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात. शिवाय ही गोष्ट मुलींसाठी धोकादायकही ठरु शकते, असे चेअरमन किशोर राणे व मुख्याध्यापिका अश्विनी गर्जे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर भाजप सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांनी याबाबत पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्याशी बोलून ही गैरसोय नक्की दूर करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सरपंच गुरुनाथ आचरेकर, चेअरमन किशोर राणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार मुख्याध्यापिका अश्विनी गर्जे यांनी केले.