⚡बांदा ता.२५-: येथील गोगटे– वाळके महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक अभिजीत गटकुळ हे नुकतेच ‘ नेट ‘ परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यु.जी.सी. दिल्लीमार्फत जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत त्यांनी यश संपादन केले.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. प्रा.गटकुळ यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष श्री. डी.बी. वारंग, उपाध्यक्ष प्रमोद कामत व संस्था पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.