कुडाळ पोलीस ठाणे तर्फे आवाहन..
कुडाळ : भैरववाडी येथील रहिवासी ध्रुवराज उर्फ राज सुनील राऊळ हा २१ वर्षीय युवक दिनांक १२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजताचे पूर्वी घरात कोणासही काही न सांगता निघून गेलेला आहे. हा मुलगा कुठे दिसून आल्यास किंवा त्याचे संदर्भात काही उपयुक्त माहिती मिळून आल्यास कृपया संपर्क करावा असे आवाहन कुडाळ पोलिसांनी केले आहे.
या युवकाबाबत काही माहिती आढळल्यास कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम
(7387687888), हेड कॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर (8605724105), महेश भोई (404775727), कुडाळ पोलीस ठाणे (02362 – 222533) किंवा मुलाचे वडील सुनील तुकाराम राऊळ (9405545599) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल, असे पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.