⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी ‘विद्यार्थी गुणगौरव समारंभ’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २:३० ते ५:३० या वेळेत सावंतवाडी भंडारी मंडळ, सावंतवाडी,शाळा नंबर ४ च्या मागे, खासकीलवाडा येथे हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
या समारंभात मार्च २०२५ मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये एस.एस.सी. (१० वी) परीक्षेत ८०% किंवा त्याहून अधिक गुण मिळवणारे आणि एच.एस.सी. (१२ वी) परीक्षेत ७०% किंवा त्याहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी तसेच पदवी आणि पदविका परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले भंडारी समाजातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. यासोबतच, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर कला व क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात येणार आहे.
या गुणगौरव समारंभात सहभागी होण्यासाठी, इच्छुक विद्यार्थ्यांनी मंडळाच्या विहित नमुन्यातील फॉर्ममध्ये आपली संपूर्ण माहिती भरून, गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतीसह २५ जुलै २०२५ पर्यंत भंडारी भवन, सावंतवाडी येथे जमा करण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दत्तप्रसाद अरविंदेकर आणि सचिव दिलीप पेडणेकर यांनी केले आहे.