कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते आक्रमक:सिंधुदुर्ग राष्ट्रवादीतर्फे कृषीमंत्र्यांना पत्त्यांचा कॅट भेट..

⚡कुडाळ ता.२४-: विधानसभेत महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे रमी खेळाचे प्रदर्शन केले त्याचा जाहीर निषेध सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या च्या माध्यमातून करण्यात आला. सिंधुदुर्गनगरी नगरी येथील जिल्हाधिकरी कायालयासमोर हि निदर्शने करण्यात आली. सिंधुदुर्ग राष्ट्रवादीतर्फे कृषीमंत्र्यांना पत्त्यांचा कॅट भेट देण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी यानानिवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, कोणत्या परिस्थितीत आम्ही सत्तेत आल्यावर कर्जमाफी करू अशी खोटी आश्वासन शेतकऱ्यांना देत. सत्तेत बसलेल्या सत्यधार्‍यांनी कोणत्याच प्रकारे आश्वासनांची पूर्तता न करता केवळ आश्वासित करून मतदारांना वाऱ्यावर सोडले.असे वारंवार निदर्शनास येताना दिसते. कोकणात गेल्या मे महिन्यात मुसळधार पाऊस पडला परंतु कोणत्याही प्रकारच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे देखील करता आले नाहीत. आंबा, काजू ,फोकळीअशा अनेक पीकांचे बेसुमार नुकसान झाले परंतु या मंत्र्यांना कोणत्याही प्रकारचं सोयर ना सुतक अशा पद्धतीत हे या सत्तेचा उपभोग घेत असताना कृषिमंत्री कोकाटे साहेब असे म्हणतात की पंचनामा काय ढेकळां चा करायचा का ? अशा पद्धतीचे वक्तव्य एखाद्या कृषी मंत्र्याला शोभेल का ? अशा पद्धतीचे प्रश्नचिन्ह तमाम जनतेपुढे उभे राहते. कृषिमंत्र्यांनी तर स्वतःचे घर बांधताना सुद्धा त्यामध्ये भ्रष्टाचार केला हेही निदर्शनास आले. कर्जमाफी झाल्यावर काही शेतकरी आपल्या कुटुंबातील विवाह समारंभ आणि कार्यक्रम पार पाडतात अशा पद्धतीचे ही बेताल वक्तव्य कृषिमंत्री करतात. तसेच लोकशाहीचे मंदिर असलेल्या ठिकाणी जनतेचा न्याय निवाडा आणि जनतेच्या दरबारात आपण जनहिताचे वक्तव्य करतो अशा ठिकाणी ऑनलाइन रमी खेळणे हा लज्जास्पद प्रकार सन्माननीय कृषि मंत्र्यांकडून घडला असतानाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अद्याप पर्यंत त्यांचा राजीनामा घेत नाहीत, हेही जनतेला न पटलेली गोष्ट आहे. कृषी मंत्री म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असंही काही मंत्री कृषी मंत्र्यांना हिणवताना पहावयास मिळतात. असे निवेदन जिल्हाधिकारी याना देण्यात आले.
या निवेदनाद्वारे शासन दरबारी हा संदेश पोहोचवावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी यावेळी केली. यावेळी साबा पाटकर, उत्तम सराफदार, सचिन पाटकर, रुपेश जाधव, जयेश धुमाळे, सावली पाटकर, तेजस्वि कदम, दीपिका राणे, ममता नाईक, सच्चिदानंद कनयाळकर, चंद्रकांत नाईक, उल्हास नाईक, गौतम महाले, अल्तमस शहा, रविकांत गवस, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, योगेश कुबल इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page