सावंतवाडी तलावाभोवतीच्या घसरड्या फुटपाथमुळे नागरिक त्रस्त…

नागरिक आणि मॉर्निंग वॉक करणारे यांनी थेट नगरपालिकेत दिली धडक; अधिकाऱ्यांना धरले धारेवर..

⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी तलावाभोवतीचा फुटपाथ सध्या मॉर्निंग वॉकसाठी धोकादायक बनला आहे. अनेक ठिकाणी ही फुटपाथ इतकी निसरडी झाली आहे की, चालताना लोक घसरून पडत आहेत. काल सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही नागरिकांना याचा फटका बसला, तर आज सकाळीही दोघे-तिघेजण चालता चालता घसरून पडले. अनेक जण पडता पडता वाचले आहेत.

विशेष म्हणजे, हॉस्पिटलमधून एसटी स्टँडकडे जाणाऱ्या बायका देखील या घसरडीचा शिकार होत आहेत. फुटपाथच्या या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.

या गंभीर समस्येकडे नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी साडेआठ वाजता सावंतवाडीतील नागरिक आणि मॉर्निंग वॉक करणारे यांनी थेट नगरपालिकेत धडक दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. माजी नगरसेवक सुरेश भोगटे, महेश नार्वेकर, सत्यजित देशमुख, विकास नारूळकर, संदीप धारगळकर, लाखे ,पाटील सर, मिस्त्री, व इतर नागरिक यात सहभागी होते. त्यांनी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा जाब विचारत धरणे धरले आणि त्यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. फुटपाथच्या तातडीने दुरुस्तीची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे.

You cannot copy content of this page