पाट हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

इयत्ता दहावी, बारावी आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव

⚡कुडाळ ता.२४-:* एस्. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय व कै.सौ.सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै.डॉ.विलासराव देसाई कला, वाणिज्य ,विज्ञान उच्च महाविद्यालय व कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सौ. सुहासिनी रामचंद्र ठाकूर स्मृतिदिन व कै.रामचंद्र निळकंठ ठाकूर पारितोषिक वितरण समारंभाचे औचित्य साधून इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थी तसेच पाचवी व आठवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी आणि इयत्ता पाचवी ते बारावी मधील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत व प्रमुख अतिथी रोटरी क्लबचे सदस्य, सायकलिस्ट रुपेश तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. जे क्षेत्र ,ध्येय आपण निवडतो त्याची जेव्हा पूर्तता होते तो आपल्या आयुष्यात मोठा क्षण असतो .एकाग्रता वाढवा, ध्येय ठरवा असा अनमोल संदेश कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रुपेश तेली यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिला .

कष्ट, जिद्द ,विश्वास यांच्या बळावर कोणतेही अशक्य काम तुम्ही शक्य करून दाखवू शकता. उच्चतम ध्येयासाठी प्रयत्न करा. संस्था तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट करायला सदैव तत्पर आहे असे आवाहन संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत यांनी आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना केले. संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगांवकर यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रुपेश तेली यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कै.सुहासिनी रामचंद्र ठाकूर व कै.रामचंद्र नीलकंठ ठाकूर यांच्या स्मृतींना उजाळा देणारे भाषण प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका दीपिका सामंत यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, सूत्रसंचालन जाह्नवी पडते, पारितोषिक वितरण प्रमुख यज्ञा साळगांवकर व आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी विजय मेस्त्री यांनी केले .या कार्यक्रमासाठी संस्था कार्यवाह विजय ठाकूर, संस्था सदस्य राजेश सामंत, महेश ठाकूर पर्यवेक्षक सयाजी बोंदर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक व्यासपीठावर उपस्थित होते ..

You cannot copy content of this page