आम. निलेश राणे:मसुरेतील उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..
⚡मालवण ता.२३-: शिवसैनिक हे पद माझ्यासाठी फार मोठे आहे. शिवसेना पक्ष वाढवा, पक्ष जपा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जसा अभिप्रेत आहे तसा पक्ष राज्यात एक नंबर वर करण्यासाठी झटूया. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे. पक्ष प्रवेशातून राजकीय नाती नको तर कौटुंबिक नाती जपूया आणि वाढवूया, मसुरे येथील विकास कामांसाठी सर्व निधी पूर्णपणे मिळेल. महायुतीचे शासन सर्व घटकाना न्याय देण्यासाठी आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी मसूरे येथे केले.
शिवसेना उबाठा गटाचे मसुरे विभागप्रमुख राजेश गावकर, माजी ग्रा सदस्य राघवेंद्र मुळीक, रीया आंगणे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मसुरे विभागाच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सचिव दादा साईल, माझी जि प अध्यक्ष संजय पडते, तालुकाप्रमुख निलेश बाईत, राजा गावडे, युवा सेना जिल्हाध्यक्ष संग्राम साळसकर, युवती सेनेच्या श्रीमती पाटकर विनायक बाईत, दीपक पाटकर, सौ. सरोज परब, सौ. गायत्री ठाकूर, सौ लक्ष्मी पेडणेकर, निलेश गावकर, छोटू ठाकूर, शिवाजी परब, जितेंद्र परब, पुरुषोत्तम शिंगरे, सचिन पाटकर आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले, गावाचे एकमत असल्यास मर्डे ग्रामपंचायतचे मसूरे नाव पुन्हा कायम केले जाईल. रमाई नदी मधील गाळ काढण्याबाबत नियोजनात्मक काम करूया. खाजणवाडी खार बंधाऱ्यासाठी स्पेशल केस करावी लागली तरी केली जाईल. आज प्रवेश करून खऱ्या शिवसेनेत आपण आलात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिल्यामुळे विधिमंडळात तुमचे प्रश्न मांडत आहे. इकडे दत्ता सामंत आपली शिवसेना वाढवत आहेत. ही जिवाभावाची संघटना आहे. आमदार झाल्यानंतर १२०० कोटीची विकास कामे होणार आहेत. यापूर्वी केवळ २०० कोटीची कामे मागील आमदारांच्या काळात झाली आहेत. कुडाळ मालवणच्या वीज प्रश्नासाठी मोठा निधी मिळत असून एकूण १७ सबस्टेशन मंजूर झाली आहेत, असेही ते म्हणाले.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, आमदार निलेश राणे योग्य पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी आजचे सर्व प्रवेश होत आहेत. अभ्यासू आमदार निलेश राणे यांच्या मागे सर्वांनी अधिक ताकदीने उभे रहावे असेही ते म्हणाले.
प्रवेशकर्ते राजेश गावकर म्हणाले, माझ्या गावचा विकास झालाच पाहिजे हीच माझी भावना आहे. आम. निलेश राणे यांच्या कामाने प्रभावित होऊन खऱ्या शिवसेनेत मी प्रवेश करत आहे, असेही म्हणाले. तसेच रमाई नदी गाळ, मसुरे ग्रामपंचायत नाव कायम रहावे, चांदेर – खाजणवाडी या भागात खार बंधारा व्हावा, तळणी येथे रस्ता खडीकरण डांबरीकरण प्रश्न, मेढा ते मागवणे रस्ता रुंदीकरण करणे आदी मागण्या त्यांनी मांडल्या.
यावेळी उपनेते संजय आंग्रे, जिल्हा सचिव दादा साईल, उपजिल्हा प्रमुख संजय पडते, माजी जि. प. अध्यक्ष सौ सरोज परब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मसुरे विभाग प्रमुख राजेश गावकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभाग प्रमुख राघवेंद्र मुळीक, माजी ग्रा.प. सदस्य रिया आंगणे, बाबू आंगणे, प्रकाश चव्हाण, शैलेश आंगणे, गुरुदास कावले, शाखाप्रमुख गणेश गावकर, सुधीर गावकर, खाजनवाडी मंडळाचे अध्यक्ष सुहास गावकर, राजन गोळे, उत्तम गावकर, दत्तराज गावकर, शर्मिला गावकर, शिवानी गावकर, एकनाथ मेस्त्री, तुकाराम सावंत, एकनाथ परब, गणेश भोगले, महेश मूळये, महेश वंजारे, पांडुरंग परब, विनय परब, शंकर गावकर, शिवराम गावकर, संतोष गावकर, शुभांगी गावकर, काजल गावकर, राजाराम मुळीक, रमेश गावकर, बळवंत गावकर, राजू मुळीक, बाबुराव राणे, बाबू चौगुले अशा प्रमुख उबाठाच्या कार्यकर्त्यांसह मसुरे जिल्हा परिषद मतदार संघातील खाजनवाडी, चांदेर, मागवणे, तळाणी, मर्डे , वेरली, खेरवंद, आंगणेवाडी, देऊळवाडा या भागातील सुमारे २०० उबाठा कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
यावेळी वेरली सरपंच धनंजय परब, हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर, बाबू परब, अनंत भोगले, पांडुरंग ठाकूर, शिवाजी परब, सचिन पाटकर, अशोक बागवे, उदय बागवे, राजू सावंत, अनंत भोगले, विलास मेस्त्री पुरुषोत्तम शिंगरे, लक्ष्मण शिंगरे, हिरबा तोंडवळकर,आदी मसुरे विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. प्रस्ताविक दत्तप्रसाद पेडणेकर, सूत्रसंचालन पंढरीनाथ मसुरकर यांनी केले.