वेंगुर्ला प्रतिनिधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिधुदुर्ग भाजपातर्फे शिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५५ जणांनी रक्तदान केले. तर विशेष निमंत्रित २० रक्तदात्यांना शाल व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांना जीवनदाता पुरस्कार देण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, पपू परब, सुहास गवंडळकर, सुजाता पडवळ, लक्ष्मीकांत कर्पे, प्रितेश राऊळ, अभि वेंगुर्लेकर, प्रकाश रेगे, मनोज उगवेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमात सहयोगी संस्था म्हणून सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, वेताळ प्रतिष्ठान, शिवप्रेमी ग्रुप-रेडी तसेच ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना गांधी चौक, शिरोडा यांचा मोलाचा सहभाग होता. विशेष म्हणजे वेताळ प्रतिष्ठानचे हे सलग ३१ वे रक्तदान शिबिर ठरले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रूग्णालय प्रशासन, आरोग्य कर्मचारी यांचेही योगदान लाभले.
फोटोओळी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.