⚡बांदा ता.२३-: पारिजात फ्रेंड सर्कल, आरोस यांच्या वतीने शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट रोजी (कै.) विद्याधर शिरसाट स्मृती कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कोंडुरे तिठा (ता.सावंतवाडी) येथील पारिजात मंगल कार्यालय येथे होणार आहे.
या स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथीसाठी पाच मिनिटे, पाचवी ते सातवीसाठी सात मिनिटे आणि आठवी ते दहावीसाठी सात मिनिटे वेळ असून ही स्पर्धा तीन गटांत घेतली जाणार आहे. विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून सदरील स्पर्धा ही सकाळी दहा वाजता सुरू होईल.अधिक माहितीसाठी मो. ९४०४७४८९८० या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आरोस येथे १ऑगस्ट रोजी कथाकथन स्पर्धेचे आयोजन…!
