सावंतवाडी : धोकोरे गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांना बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी तालुका संपर्कप्रमुख राजू नाईक तसेच राजू नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम मंगळवार, १२ जुलै २०२५ रोजी पासून राबविण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण पालव, शाळेतील शिक्षक श्री अर्जुन रणशूर, श्रीमती आरोदेकर , प्रणिता भगत, श्रीमती नार्वेकर आदी उपस्थित होते. आरोस गावातील एकूण पाच शाळा मध्ये शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले या गावातील गिरोबा विद्यालयांमध्ये 61 विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा नागोजी वाडी मध्ये 16 अंगणवाडीमध्ये 12 परबवाडी मध्ये 14 तर आरोस विद्या विकास हायस्कूल मध्ये 161 आणि इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये 177 विद्यार्थ्यांना मिळून 441 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
करण्यात आले तर आजगाव येथे दोन शाळांमध्ये 68 विद्यार्थ्यांना शालेय शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये जिल्हा परिषदेच्या वसवाचे तळे या शाळेला सुद्धा साहित्याचे वाटप करण्यात आले.धाकोरे गावातील शाळेतील मुलांना राजू नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
राजू नाईक यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून राजू नाईक प्रतिष्ठानच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय अशी कामगिरी करत आहोत. त्यांनी विद्यार्थ्यांना आपले आई-वडील आणि शिक्षकांचे ऐकण्याचे आवाहन केले. अभ्यास करून गावाचे नाव मोठे करण्यास सांगितले
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण पालव यांनी राजू नाईक यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबाबत काही समस्या असल्यास थेट राजू नाईक यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. राजू नाईक यांनी तात्काळ प्रतिसाद देत शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल शाळेतील शिक्षकांनी आभार व्यक्त केले.
सावंतवाडी तालुक्यामधील हुशार गरजू होतकरू विद्यार्थ्यांना राजू नाईक प्रतिष्ठानकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप सुरू …
