नोटीसा मिळालेल्या मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकांना संपर्काचे आवाहन…

⚡मालवण ता.२३-:
किनारपट्टीवरील ज्या मच्छिमार पर्यटन व्यवसायिकांना प्रशासनाकडून सीआरझेड कायदा उल्लंघनाच्या नोटीसा आलेल्या आहेत, त्यांनी मालवण भाजपा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी केले आहे.

किनारपट्टीवरील निवासी घरे, मत्स्य व पर्यटन व्यवसायिकांना प्रशासनाकडून सीआरझेड कायदा उल्लंघनाच्या नोटीसा आलेल्या आहेत, सदर विषयात राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधलेले आहे. संबंधित विषयात राज्य व केंद्र शासनाचे धोरणात्मक बदल प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने नोटीसा बजावलेल्या व्यक्तींना १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत आपले म्हणणे सादर करावयास सांगितले आहे, अन्यथा कारवाई होणार असल्याचे नोटीस मध्ये नमूद आहे. सदर विषयात प्रशासनाकडे संबंधितांची एकत्रित कायदेशीर बाजू मांडण्याच्या दृष्टिकोनातून भाजपा मच्छीमार सेलने पुढाकार घेतला आहे. तरी प्रशासनाच्या नोटीसा आलेल्या व्यक्तींनी संबंधित कागदपत्रांसहित भाजप मालवण तालुका कार्यालय, फोवकांडा पिंपळ मालवण या ठिकाणी संपर्क साधावा, असे रविकिरण तोरसकर (९४२२६३३५१८) यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page