भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजन..
⚡मालवण ता.२३-:
भंडारी एज्युकेशन सोसायटी संचालित भंडारी कनिष्ठ महाविद्यालय मालवण च्या सुवर्णमहोत्सवा निमित्त आयोजित व माजी विद्यार्थी श्री. अनिकेत फाटक व सौ. अमृता फाटक पुरस्कृत तसेच माजी विद्यार्थी ऍड. प्रथमेश सामंत यांच्याकडून चषक पुरस्कृत असलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून तृष्णा यशवंत गांवकर (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल, मालवण) व महाविद्यालयीन गटातून साईवेद रवींद्र मालवणकर (संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, मालवण येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत दोन्ही गटात मिळून जिल्हाभरातील ५१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – शालेय गट – प्रथम – तृष्णा यशवंत गांवकर (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल, मालवण), द्वितीय – पार्थ प्रदीप सामंत (टोपीवाला हायस्कुल, मालवण), तृतीय – स्वरा चंद्रशेखर कांबळी (ओझर विद्यामंदिर, कांदळगाव), उत्तेजनार्थ प्रथम – ओजस रुपेश घाडीगावकर (टोपीवाला हायस्कुल, मालवण), उत्तेजनार्थ द्वितीय – भाविका प्रसाद चव्हाण (आचरा हायस्कुल). महाविद्यालयीन गट – प्रथम – साईवेद रवींद्र मालवणकर (संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ), द्वितीय – श्रेया संदीप शेळके (अचिर्णे ज्युनियर कॉलेज), तृतीय – रिया गणेश गिरकर (संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ), उत्तेजनार्थ प्रथम – श्रावणी राजन आरावंदेकर (वेतोरे ज्युनियर कॉलेज), उत्तेजनार्थ द्वितीय – दिया दत्तात्रय गोलतकर (भंडारी ज्युनियर कॉलेज, मालवण).
या स्पर्धेचे परीक्षण गुरुनाथ ताम्हणकर, ऍड. सौ. समीरा प्रभू, हृदयनाथ गावडे, चिंतामणी सामंत यांनी केले. सर्व विजेत्यांना शनिवार दि. २६ जुलै रोजी सकाळी १० वा. मालवण येथे होणाऱ्या भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता समारंभात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे, तरी विजेत्या स्पर्धकांनी समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.