भाजपाने घेतला मालवण तालुक्यात कोरोना आढावा…

प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या भेटी;सभापती चव्हाण, पाताडे,तालुकाध्यक्ष चिंदरकर आदिंची प्रमुख उपस्थिती

*💫मालवण दि.३०-:* कोरोना महामारीच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती महेन्द्र चव्हाण, मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर तसेच भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरपंच संघटना अध्यक्ष महेश मांजरेकर यांनी संयुक्तरित्या मालवण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोविड केंद्राला भेट देऊन आरोग्य स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये तालुक्यातील हिवाळे, गोळवण, आचरा, मसुरे, चौके प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कुंभारमाठ येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन आढावा घेण्यात आला. यावेळी सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात लसी ची कमतरता तसेच डिझेल संदर्भात कमतरता आढळली. त्यासंदर्भात जिल्हास्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच या कठीण काळात आरोग्य यंत्रणा आपले काम चोख बजावत असल्याने लोकप्रतिनिधीनी कौतुक केले. यावेळी काही महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या. कुंभारमाठ येथील कोविड केंद्र ठिकाणी कायमस्वरूपी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी लागेल ते सहकार्य देण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या. तसेच यावेळी उपस्थित जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे यांच्या कडे लस पुरवठा तसेच डिझेल पुरवठा संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी केली. डिझेल साठी तत्काळ तालुका आरोग्य अधिकारी यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातील असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. या आढावा दौऱ्यामध्ये आपापल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्रामध्ये जिल्हापरिषद सदस्या सौ. सरोज परब, पंचायत समिती सदस्या सौ. गायत्री ठाकूर, सौ. सागरिका लाड, सरपंच सुभाष लाड, माजी सभापती सौ. मनीषा वराडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page