मच्छीविक्रेत्या तिलोत्तमा लोणे यांचे निधन…

मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली येथील तिलोत्तमा पुरुषोत्तम लोणे वय (८०वर्षे) यांचे शुक्रवारी पहाटे त्यांच्या रहात्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या मालवण भरड नाका येथे मच्छी विक्री करत असत. त्यांचा लोकसंपर्क दांडगा होता. त्यांच्या पार्थिवावर तारकर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सूना, जावई,नातवंडे , पतवंडे, असा परिवार आहे. ओरोस येथील पोलीस हवालदार विद्याधर लोणे तसेच होमगार्ड रुकमांगत लोणे यांच्या मातोश्री होत. तर पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत लोणे यांची त्या आजी होत्या.

You cannot copy content of this page