भूषण बाक्रे यांना राज्यस्तरीय नृत्यजित पुरस्कार प्रदान…

पुणे येथील संस्थांच्या वतीने सन्मान..

कुडाळ : कुडाळ मधील एक अष्टपैलू कलाकार भूषण विलास बाक्रे यांना आज पुणे येथे झालेल्या शानदार समारंभात नृत्य गुरूंना दिला जाणारा राज्यस्तरीय नृत्यजित पुरस्कार २०१५ देऊन सन्मानित करण्यात आले.
जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन, पुणे आणि आशुतोष डान्स स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात शनिवारी सकाळी हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. सिंधुदुर्गमधील अष्टपैलू कलाकार आणि नृत्यगुरू भूषण बाक्रे यांनी मराठी चित्रपट सृष्टी अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि अनहीनेते आणि निर्माते शहाजी राजे पाटील यांच्या हस्ते हा मानाचा नृत्यजित पुरस्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार असून नृत्य क्षेत्रातील प्रामाणिक, हरहुन्नरी, प्रामाणिक, अभ्यासू आणि समाजाभिमुख नृत्यगुरूंना हा नृत्यजित पुरस्कार देण्यात येतो. राज्यभरातील १० नृत्यगुरूंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विविध कॅटेगिरीमध्ये ३४ जणांना पुरस्कार वितरण करण्यात आले. यामध्ये जीवनजीत गौरव पुरस्कार, कर्मजित पुरस्कार, कलाजित पुरस्कार आणि नृत्यजित पुरस्कार अशा कॅटेगिरीचा समावेश आहे.
भूषण बाक्रे हे गेली अनेक वर्षे नृत्य, नाट्य, संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. महाविद्यालयिन जीवनात मुंबई विद्यापिठाच्या युवा महोत्सवात विद्यापीठाच्या टीम मध्ये प्रतिनिधित्व केले होते. अनेक कार्यक्रमामध्ये ते स्वतः नृत्य कला सादर करतात तसेच नृत्य प्रशिक्षण शिबिरांमधून त्यांनी अनेक शिष्य सुद्धा तयार केले आहेत. नाट्यक्षेत्रात सुद्धा त्यांचा वावर असतो. विविध एकांकिका, नाटके, राज्य नाट्य स्पर्धा यातून सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page