गेल्या २४ तासात १७५ मिमी पावसाची नोंद:कुडाळमध्ये दहा कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलविले..
⚡कुडाळ ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. कुडाळ तालुक्यात सुद्धा कोसळत्या धारांनी जनजीवन विस्कळीत केले आहे. गेल्या २४ तासात कुडाळ मध्ये १७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्ली नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. कर्ली नदीची इशारा पातळी ९. ९१० मीटर एवढी आहे. पण आज दुपारी २ वाजता भंगसाळ पुलावर घेतलेली इशारा पातळी १० मित्र एवढी आहे. त्यामुळे कुडाळ शहारत आंबेडकर नगर येथील वस्तीत पाणी शिरलं आहे. दहा घरांना पुराच्या पाण्याने वेढल्याने त्या घरातल्या सदस्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कर्ली नदीकाठच्या बाव, बांबुळी, पावशी, सरंबळ या गावांना तहसील कार्यालयाकडून दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरसदृशय परिस्थिती निर्माण झाली आहे. काही वाहतूक मार्ग पाण्याखाली गेल्यानं त्या ठिकाणची वाहतूक बंद होती. कडुअल शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर सकाळी पाणी आल्याने तो मार्ग बंद होता. तर हॉटेल गुलमोहोर कडे पाणी आल्याने त्याठिकाणहून होणारी एसटी वाहतूक राज हॉटेल मार्गे वळविण्यात आली होती. माणगाव खोऱ्यात दुकानवाडसह अन्य छोटी मोठे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दिवसभर जिल्हयात पावसाचा जोर वाढला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.