विद्यार्थ्यांनी कीर्तीवंत होतानाच आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करावे…

सायली गुरव:वाघेरी गुरववाडी शिक्षणप्रेमी व गुरव बांधवांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

⚡कणकवली ता.०२-: सध्याचे स्पर्धेचे युग आहे. या युगात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रमांची जोड द्यायला हवी. विद्यार्थ्यांनी नियोजनबध्द अभ्यास करायला हवा. यशवंत विद्यार्थ्यांनी कीर्तीवंत होतानाच आपल्या गावाचे पर्यायाने देशाचे नाव उज्ज्वल करावे.असे आवाहन अखिल गुरव समाज महीला जिल्हाध्यक्षा तथा कणकवली केंद्र शाळा मुख्याध्यापिका सायली गुरव यांनी केले.

वाघेरी, गुरववाडी शिक्षणप्रेमी बांधव व मुंबईस्थित गुरव बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने हरीत क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दीनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य व भेट वस्तू देवून सत्कार केला. यावेळी त्या बोलत होत्या.

वाघेरी येथे झालेल्या या कार्यक्रमात नवोदय परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक तसेच तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या पार्थ विकास गुरव व नवोदय परीक्षेतील यशवंत विद्यार्थी ओम् संदिप पवार तसेच जिल्हा क्रीडा शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी साईश नितेश राणे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हापरिषद शाळा वाघेरी नं.१ व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान गुरव, प्रशालेच्या मुख्याध्यापिका विनया तांबे, सदाशिव राणे, विजय पाताडे ,यशस्वी विद्यार्थ्यांच्या वर्ग शिक्षका सुलभा तांबे व गौतम तांबे, अखिल गुरव समाज तालुकाध्यक्ष तथा कृषी अधिकारी चंद्रकांत गुरव, जिल्हाध्यक्ष राजू गुरव, तालुका युवा अध्यक्ष मनोज गुरव, वाघेरी ग्रामपंचायत सदस्य किशोर राणे, निधी राणे, कविता कदम, माजी सरपंच संतोष राणे, सुहास राणे, विजय गुरव, पियाळी उपसरपंच संजय ढवण, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रकाश वाघेरकर, मुरलीधर राणे, शामसुंदर गुरव, अनंत गुरव, पोलिस पाटील अजिंक्य गुरव, महेंद्र राणे, राजेश राणे, प्रदीप राणे, महेश गुरव ,एकनाथ गुरव, चंद्रकांत ग. गुरव,अक्षय गुरव, मनीषा राणे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी राजेश राणे यांनी गुणवंत विद्यार्थ्याना शुभेच्छा देताना आपल्या गावातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेवून डॉक्टर बनावेत आणि येथील रुग्णांची सेवा त्यांनी करावी.अशी अपेक्षा व्यक्त केली. भजन सम्राट बुवा चंदु गुरव यांनी सुत्रसंचलन केले.

You cannot copy content of this page