⚡सावंतवाडी ता.०१-:
भाजपा नेते, माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सावंतवाडी भाजपाकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी चव्हाण साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है !, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
कोकणचे सुपुत्र रविंद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानं कोकणात भाजप आणखीन बळकट होईल असा विश्वास सावंतवाडी खरेदी विक्री संघ चेअरमन प्रमोद गावडे यांनी व्यक्त केला. तर माजी तालुकाध्यक्ष रविंद्र मडगावकर म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्सव होत असून सावंतवाडी तालुक्यातील भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी फटाके फोडून, घोषणा देत जल्लोष करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, जिल्हा चिटणीस महेश धुरी, सावंतवाडी खरेदी- विक्री संघ चेअरमन प्रमोद गावडे, माजी नगरसेवक गुरु मठकर, मिसबा शेख शहर उपाध्यक्ष सुकन्या टोपले,शहर उपाध्यक्ष ज्योती मुद्राळे, शहर सरचिटणीस मेघना साळगावकर, माजी शहराध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर, दशरथ मांजरेकर दत्ताराम कोळमेकर, उल्हास परब, गणेशप्रसाद पेडणेकर, संजय शिरसाठ, राजन राणे, ज्ञानदीप राऊळ, कुणाल श्रृंगारे, अमित गौंडळकर, नागेश जगताप, मधुकर देसाई, प्रविण देसाई, योगेश गवळी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.